परप्रांतीय मजूर हजारोंच्या संख्येने महाराष्ट्रात परतण्यास सुरुवात; गृहमंत्री अनिल देशमुखांची माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । पुन:श्च हरी ओम म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातला लॉकडाऊन शिथील करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर बंद झालेले व्यवसाय आणि उद्योग पुन्हा सुरू झाले. उद्योग सुरू झाल्यामुळे आता परराज्यातले मजूर पुन्हा महाराष्ट्रात परतायला सुरुवात झाली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, रायगड व राज्याच्या इतर भागात दररोज जवळपास १६ ते १७ हजार मजूर परतत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मजुरांची योग्य नोंद व थर्मल तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

“कोरोनाशी लढताना महाराष्ट्र सरकारने लॉकडाउन जाहीर केलं होतं. राज्यात मोठ्या प्रमाणात उद्योग, व्यवसाय करोनाच्या संकटामुळे बंद झाले होते. पण आता राज्य शासनाने अनलॉकचा निर्णय घेतला आहे. यामुळे उद्योग व्यवसाय हळूहळू चालू झाले आहेत. हे चालू होत असल्याने महाराष्ट्रातील परप्रांतीय श्रमिक जे आपापल्या राज्यात उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश येथे मोठ्या प्रमाणात परत गेले होते त्यांची महाराष्ट्रात घऱवापसी सुरु झाली आहे. मोठ्या संख्येने ते येत आहेत. आजच्या तारखेला दिवसाला १६ ते १७ हजार मजूर महाराष्ट्रात परत येत आहेत. हळूहळू ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल,” अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment