कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील कोयना नगर परिसरात रविवारी 3. 9 रिश्टर स्केलचा भूकंपाचा सौम्य स्वरुपाचा धक्का बसला. रविवारी बसलेल्या या धक्क्यामुळे कोयना धरणाला कोणताही धोका नसल्याची माहिती धरण व्यवस्थापन सुत्रांनी दिली.
रविवारी बसलेल्या सौम्यस्वरूपाच्या भूकंपाच्या धक्क्याचा केंद्रबिंदू हा कोयना धरणापासून वारणा खोऱ्यात तनाली गावाच्या पश्चिमेला 12 किलोमिटर अंतरावर होता. तर भूकंपाची खोली 11.37 किलोमीटर अंतरावर होती, अशी माहिती कोयना सिंचन विभागाने दिली.
कोयना धरण परिसरात अनेकवेळा अशा स्वरूपाचे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत असतात. अनेक दिवसांनंतर आज कोयनानगरला भूकंपाचा धक्का जाणवला आहे. यामध्ये कोणत्याही स्वरूपाची जीवितहानी किंवा नुकसान झालं झालेले नाही.