हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अगोदरच कोरोना व लॉकडाऊनमुळे सराज्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय. आता औरंगाबाद जिल्ह्यात पावसाने अक्षरश: हाहाकार माजवत काढणीला आलेली पीकं उध्वस्त केली. यात शेतकऱ्याचे हजारो-लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्याना तातडीने मदत द्यावी तसेच औरंगाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. जलील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तसे पत्रही लिहले आहे.
खासदार जलील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेल्या पत्रात म्हंटले आहे की, औरंगाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱयांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागातील शेतकरी बांधवांची उभी पिके वाहून गेली आहेत.आणि शेतात गुडघ्यापर्यंत पाणी साचून जमिनीवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. शेतकरी बांधवांचे फार मोठे नुकसान परतीच्या पावसामुले झालेले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तत्काळ औरंगाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा.
या ठिकाणी झालेल्या नुकसानीची महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्री, आमदार व सत्ताधारी पक्षाचे वरिष्ठ नेत्यांनी येऊन पाहणी केली आहे. फोटोही काढले. शिवाय नेहमीप्रमाणे जिल्हाप्रशासनास तात्काळ पंचनामे करुन आठ ते दहा दिवसात शासनाच्या वतीने नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. शेतकरी बांधव व ग्रामस्थांना शासनस्तरावरुन आर्थिक मदत मिळाली का? याची शहानिशा करण्यासाठी जिल्ह्याचा खासदार या नात्याने इम्तियाज जलील यांनी नुकसानग्रस्त भागाला प्रत्यक्ष भेटी देवून स्थळ पाहणी केली आहे.