सांगली : अपघाता मध्ये जखमी झालेल्या पती-पत्नीच्या मदतीसाठी थेट राज्यमंत्री बच्चू कडू धावून गेले. पुणे-बंगळुरु मार्गावरील इस्लामपूर नजीकच्या हायवेवर दुचाकीला अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणाहून जाणारे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी जखमींची तातडीने मदत करत,जखमींना आपल्या शासकीय गाडीतून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं.
इस्लामपूर या ठिकाणी एका कार्यक्रमासाठी राज्यमंत्री बच्चू कडू हे आले होते.त्यानंतर कार्यक्रम आटपून ते पुणे-बेंगलोर मार्गावरून सातारा याठिकाणी निघाले असता, नेर्ले नजीक दुचाकीला अपघात झाला. ज्यामध्ये दुचाकीवरील पती-पत्नी हे जखमी झाले आणि ते दोघेही रस्त्यावर पडले होते त्याच वेळी मागून येणाऱ्या राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या निदर्शनास हा अपघाताला त्यांनी तात्काळ आपला ताफा थांबवण्याचे आदेश देऊन, स्वतः गाडीतून उतरून जखमींच्याकडे धाव घेतली.
दोघा जखमींना आहे तातडीने आपल्या गाडीत घालून तात्काळ रुग्णालयाकडे पाठवून दिलं व स्वतः दुसऱ्या गाडीने मार्गस्थ झाले.तर यानिमित्ताने मंत्री बच्चू कडू यांची माणुसकी पाहायला मिळाली.