हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या चुकीच्या कृत्यामुळे मंत्रीपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. भाजप नेत्यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरल्याने मुंडे यांच्यासमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करून ही मागणी केली आहे. मुंडे यांनी आपल्या चुकीच्या कृत्यामुळे तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. मुंडेंवरील लैंगिक शोषणाचे आरोप पाहता त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. भाजप महिला शाखेने एक पत्रक काढून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे आम्हीही या विषयावर आणखी जोरदार मागणी करत आहोत, असं पाटील यांनी म्हटलं आहे.
लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या @dhananjay_munde यांनी तात्काळ राजीनामा द्यावा ! @OfficeofUT @PawarSpeaks pic.twitter.com/PVrlONAoBb
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) January 13, 2021
ज्यांच्यावर अशा प्रकारचे आरोप होतात. त्यांना या पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसतो. मात्र, गेंड्याच्या कातडीचे हे मंत्री आणि महाविकास आघाडीचे सरकार याबाबत आत्मपरिक्षण करून मुंडेंचा राजीनामा घेतील असं वाटत नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.
नक्की काय आहे प्रकरण?
रेणू शर्मा असे या धनंजय मुंडेंविरोधात तक्रार करणाऱ्या महिलेचे नाव आहे. रेणू शर्मा ही एक बॉलिवूड गायिका आहे. रेणू अशोक शर्मा असे तिचे संपूर्ण नाव आहे. धनंजय मुंडे यांनी माझ्या इच्छेविरुद्ध माझ्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. धनंजय मुंडे दर दोन-तीन दिवसांनी माझ्या घरी यायचे आणि शारीरिक संबंध प्रस्थापित करायचे असा आरोप तिने केला आहे.तसेच मला सांगितले की, जर तुला गायिका बनायचे असेल, तर मी तुला बॉलिवूडच्या मोठ्या मोठ्या दिग्दर्शक निर्मांत्याशी भेटवेन. तुला बॉलिवूडमध्ये लाँच करेन. या नावाखाली धनंजय मुंडेंनी इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवला. तसेच माझी बहीण घराबाहेर असतानाही धनंजय मुंडेंनी माझ्यावर शारीरिक संबंध प्रस्थापित केले.”
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’