मंत्री गुलाबराव पाटील यांचं ट्विटर अकाउंट हॅक? प्रोफाइलवर फोटो भलत्याच कुणाचा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । महाविकास आघाडी सरकामधील पाणी पुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचं ट्विटवर अकाउंट हॅक झाल्याचे समजतेय. गुलाबराव पाटील यांच्या ट्विटवर अकाउंट प्रोफाइल फोटोच्या जागी भलत्याच कोणाचा फोटो दिसत आहे. त्यामुळं प्रथमतः गुलाबराव पाटील यांचे ट्विटवर अकाउंट हॅक झाल्याचे समजतेय.

याशिवाय गुलाबराव पाटील यांचे ट्विटवर अकाउंट लॉक झाल्याचे चिन्ह त्यांच्या ट्विटर प्रोफाईलवर दिसत आहे. सोबतच त्यांच्या ट्विटर टाइमलाईनवरील त्यांनी केलेलं एकही ट्विट दिसत नाहीये.

दरम्यान, गुलाबराव पाटील यांच्या ट्विटर अकाउंटबाबत अधिकृत माहिती समोर आली नसून ट्विटरवरील गुलाबराव पाटील यांचे फॉलोअर्स त्यांचे अकाउंट हॅक झाल्याचे ट्विट करत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

Leave a Comment