आमिर खानच्या ‘लालसिंग चड्ढा’ तुन विजय सेतुपति बाहेर, ‘हे’ कारण समोर आले!

नवी दिल्ली । साऊथचा दिग्गज स्टार विजय सेतुपति (Vijay Sethupati) आजकाल बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवत आहे. एकामागून एक त्यांच्याशी संबंधित बातम्याही समोर येत असतात. कधी त्याच्या एखाद्या नवीन चित्रपटाची चर्चा असते, तर कधी त्याच्या वेब सिरीजची. अलीकडेच त्याचा ‘मास्टर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे, जो बराच चर्चेत आहे. या चित्रपटात विजय आणि विजय सेतुपति यांच्या जोडीला लोकांनी खूप लाईक्स केले आहे. मास्टरच्या यशामुळे विजय सेतूपतीविषयी आणखी एक मोठी बातमी समोर येते आहे, जी त्याच्या चाहत्यांना निराश करेल.

बातमी अशी आहे की, आमिर खानच्या (Aamir Khan) ‘लालसिंग चड्ढा’ (Laal Singh Chadha) या चित्रपटामधून विजय सेतुपतिला वगळले गेले आहे. 2019 मध्ये, आमिर खान आणि विजय सेतुपति लालसिंग चड्ढामध्ये एकत्र काम करणार असल्याचे वृत्त आहे. लालसिंग चड्ढा हा हॉलिवूड मधील फिल्म ‘फॉरेस्ट गम्प’ चा हिंदी रिमेक आहे. 2020 च्या उन्हाळ्यात या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होणार होते पण कोरोना विषाणूच्या साथीमुळे चित्रपटाचे शूटिंग लांबणीवर पडले. आता असे अनेक रिपोर्ट समोर येत आहेत ज्यात विजय सेतुपति या चित्रपटातून बाहेर पडल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटात विजय आमिर खानच्या मित्राची भूमिका साकारणार होता. इंग्लिश चित्रपटातील टॉम हँकचा मित्र मॅकेल्टी विल्यमसनने साकारला होता. आमिरच्या मित्राचे पात्र तमिळ करण्यासाठी निर्मात्यांनी चित्रपटाची स्क्रिप्ट बदलली.

असे मानले जात आहे की, विजय सेतुपतिने आपले वजन वाढवल्यामुळे आमिर खान नाराज झाला होता आणि त्याच्या शरीरानुसार तो चित्रपटात आपल्या मित्राची भूमिका साकारण्यासाठी सध्या योग्य दिसत नव्हता. परंतु विजय सेतुपति यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले की, विजय यापूर्वी त्याने करार केलेल्या इतर प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त झाला आहे, म्हणून त्याने आमिरला चित्रपटातील त्या भूमिकेसाठी दुसरा कोणीतरी शोधण्याची विनंती केली. अद्वैत चंदन हा लाल सिंह चड्ढा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.

विजय सेतुपति नुकताच विघ्नेश शिवन यांची फिल्म Kaathuvaakula Rendu Kaadhal या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटात समन्था अक्किनेनी आणि नयनतारा यांच्या मुख्य भूमिका आहेत. याशिवाय तुघलक दरबार आणि कदियासी विवासिया हे चित्रपटदेखील रिलीज होण्याच्या मार्गावर आहेत. यापूर्वी विजय उपेन्ना या चित्रपटात दिसला होता. त्यामधील त्याच्या अभिनयाचेही खूप कौतुक होत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like