हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईमध्ये त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. हाती आलेल्या माहितीनुसार हसन मुश्रीफ यांच्यावर मुंबईमध्ये बॉम्बे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
बॉम्बे हॉस्पिटलच्या बाराव्या मजल्यावर, डॉ. गौतम भंसाळी यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांना ताप आल्याने उपचार सुरु असल्याची माहिती भेय्या माने यांनी दिली आहे.
काही दिवसांपूर्वी हसन मुश्रीफ यांच्यावर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी 127 कोटींच्या भ्रष्ट्राचाराचे आरोप केले होते. हसन मुश्रीफांच्या कुटुंबाने बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर हसन मुश्रीफ यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन सोमय्यांच्या आरोपांचे खंडन केले होते.