महाराष्ट्रातील रस्तेबांधणीसाठी तब्बल 2 हजार 780 कोटींचा निधी; गडकरींची मोठी घोषणा

nitin gadkari
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील रस्तेबांधणीच्या कामांसाठी २७८० कोटींहून अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे.  याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली आहे. नितीन गडकरी यांनी गुरुवारी सकाळी केलेल्या वेगवेगळ्या ट्विटमध्ये #PragatiKaHighway हा हॅशटॅग वापरत महाराष्ट्रातील विविध रस्त्यांची पुन:बांधणी आणि विस्तारीकरण करण्यासाठी मंजूर झालेल्या निधीसंदर्भात माहिती दिली.

राष्ट्रीय महामार्गसाठी भक्कम निधी

राष्ट्रीय महामार्ग १६६ ई वरील गुहार चिपळूणला जोडणाऱ्या रस्त्याचं काम करण्यासाठी १७१ कोटी, चिपळूणच नाही तर जळगाव-मनमाड राष्ट्रीयमहामार्ग महामार्ग ७५३ जे च्या विस्तारीकरणासाठी २५२ कोटी रुपये मंजूर झाले असून हा रस्ता दोन पदरी किंवा चार पदरी करण्यात येणार आहे.

लहान मोठ्या पुलांची बांधणी

गडचिरोली तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ३५३ सीवरील २६२ किमी ते ३२१ किमीच्या अंतरामध्ये १६ लहान मोठे पूल बांधण्यात येणार असल्याची घोषणाही गडकरींनी केलीय. यासाठी २८२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

राष्ट्रीय महामार्ग ७५२ आयवरील वातूर ते चारथाना दरम्यानच्या रस्त्याच्या काम करण्यासाठी २२८ कोटी रुपये,  तिरोरा ते गोंदियादरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग ७५३ च्या दोन पदरी रस्त्याचं बांधकाम करण्यासाठी २८२ कोटी रुपये,

तारीरी- गगनबावडा – कोल्हापूर

तारीरी- गगनबावडा – कोल्हापूर या राष्ट्रीय महारमार्ग १६६ जीवरील रस्त्याच्या कामासाठी १६७ कोटी रुपये, तिरोरा गोंदियादरम्यानच्या राज्य महामार्गाच्या बांधकामासाठी २८८.१३ कोटी

रुपये, नागपूरमध्ये आरटीओ चौक ते नागपूर विद्यापीठ कॅम्पस असा उड्डाणपूल बांधण्यासाठी तसेच राष्ट्रीय महामार्ग ५३ वर वाडी/एमआयडीसी जंक्शन येथे चार पदरी उढ्डाण पूल बांधण्यासाठी ४७८ कोटी ८३ लाख रुपये, नांदेड जिल्ह्यातील येसगी गावामध्ये मांजरा नदीवर पूल बांधण्यासाठी १८८ कोटी ६९ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

तसेच आमगाव गोंदियादरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग ५४३ साठी २३९ कोटी २४ लाख रुपये, राष्ट्रीय महामार्ग ३६१ एफच्या परळी गंगाखेडदरम्यानच्या कामासाठी २२२ कोटी ४४ लाख रुपये मंजूर करण्यात आल्याची घोषणा गडकरी यांनी केली आहे. ही सर्व कामे महाराष्ट्रातील असून एप्रिल च्या पहिल्याच आठवड्यात गडकरी यांनी नागरिकांना दिलासा दिला आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group