हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस पार पडत आहे. या अधिवेशनात अध्यपक्षपदाच्या निवडीवरून व निवडणुकीवरून भाजप नेत्यांनी चांगलाच आक्रमक पावित्रा घेतला. यावरून राज्यमंत्री बच्चू कडू यांनी भाजपवर निशाणा साधला. अधिवेशनाचे दिवस हे कोरोनामुळे कमी आहेत. अधिवेशन हे जाणीवपूर्वक गुंडाळण्याचा प्रयत्न नाही. भाजपच्या आरोपांना काहीच अर्थ नाही. त्यांना अध्यक्ष निवडीबाबत बोलण्याचा अधिकार नाही. आजारपणात भान नसलेलं उदाहरण म्हणजे भाजप आहे,” अशी टीका मंत्री बच्चू कडू यांनी केली.
आज महत्वाच्या असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या 28 डिसेंबर रोजी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. यावरून भाजप कडून टीका होऊ लागल्याने मंत्री बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, अध्यक्षपदाबाबत जे काही भाजपकडून आरोप केले जात आहेत. त्यांच्या आरोपांना काहीच अर्थ नाही, अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे.
एसटी कामगारांच्याबाबत मंत्री बच्चू कडू यांनी म्हंटले की, आम्ही एसटी कामगारांच्यासोबत आहोत. त्यामुळे कामगारांनी आता मागण्यांवर असून न बसता. कामावर लवकर रुजू व्हावे. तुमच्या मागण्यासंदर्भात आम्ही तुमच्यासोबत आहोत. तुम्हाला आम्ही सहकार्य करू, असेही मंत्री बच्चू कडू यांनी सांगितले.