भाजपने आंदोलन करण्यापेक्षा मोदींनाच साकडे घालावे; विजय वडेट्टीवारांचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप व भाजप अद्यात्मिक आघाडीच्यावतीने आज राज्यभर मंदिरे उघडण्याबाबत घंटानाद आंदोलने करण्यात येत आहेत. यावरून राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी खुलासा करीत भाजपवर टीकास्त्र डागले. “मंदिरं बंद करण्याचा निर्णय आमचा नाही. हा निर्णय केंद्र सरकारचा आहे. अशा प्रकारे आंदोलन करण्यापेक्षा मोदींनाच साकडे घालावे. त्यांना मंदिरे उघडण्याचे आदेश दयावेत असे सांगावे. त्यानंतर अशा प्रकारची घटानाद आंदोलने करण्याची भाजपवर वेळ येणार नाही, असा टोला वडेट्टीवारांनी लगावला.

मंदिर खुले करण्याच्या आंदोलनातून भाजप नेत्यांकडून राज्य सरकारवर निशाणा साधला जात आहे. आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही आंदोलनातून मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा साधला. “चारचाकी गाडीतून थेट मंदिरात जाऊन पूजा करणाऱ्यांना वारकऱ्यांच्या भावना काय कळणार? असा टोला पाटलांनी मुख्यमंत्रीपणा लगावला होता. दरम्यान आज वडेट्टीवारांनी माध्यमांशी संवाद सांडत भाजपच्या आंदोलनामागील व त्यांचे आंदोलन कोणाविरुद्ध असल्याची माहिती दिली.

वडेट्टीवार म्हणाले की, आम्ही फक्त केंद्राच्या सूचनांचे पालन करत आहोत. भाजपने शुद्धीत येऊन बोलाबे, बेधुंद वक्तव्य करू नयेत. जर केंद्र सरकारने मंदिरे खुली करण्याचा उद्या निर्णय घेतला तर आम्ही तो लगेच घेऊ. मात्र, केंद्राच्या आदेशा, सूचनेप्रमाणे आम्ही काम करतोय. आणि केंद्राकडून मंदिरे न उघडण्याच्या सूचना आहेत. भाजपचे शंखनाद आंदोलन हे राज्य नाही तर केंद्र सरकारच्या विरोधात आहेत. त्यामुळे एकप्रकारे पुन्हा धार्मिक भावनांचा आधार घेत भाजपकडून भावना भडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Leave a Comment