शाळेत निघालेल्या अल्पवयीन मुलासोबत केलं नको ते कृत्य; नराधमाला 20 वर्षांची सक्तमजुरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे

हनुमाननगर येथील एका अल्पवयीन मुलाला खून करण्याची धमकी देत त्याच्यावर अनैसर्गीक अत्याचार करणाऱ्या नराधमास न्यायालयाने दोषी धरून २० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. जाफर जमीर उर्फ जमाल नदाफ (वय १९ रा. हनुमानगर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. सदरची घटना हि ३१ डिसेंबर २०१९ साली घडली होती. सदरची शिक्षा विशेष अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी सुनावली.

याबाबत अधिक माहिती अशी कि, पीडित मुलगा आणि आरोपी हे दोघेही हनुमानगर परिसरातच राहतात. दोघांचीही ओळख होती. ३१ डिसेंबर २०१९ रोजी पिडीत मुलगा हा शाळेतल्या प्रोजेक्टची बॅटरी आणण्यासाठी सायकलवरुन चांदणी चौक येथे जात होता. त्यावेळी आरोपी जाफर नदाफ याने पिडीत मुलाला डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील विदयामंदिर सांगली शाळा क. ३४ ला सुट्टी असल्याने तेथे कोणीही नाही हे पाहून, पिडीत मुलास अडवले.

शाळेच्या कम्पाउंडमध्ये माझा मोबाईल पडला आहे. तो शोधून आणूया असे खोटे सांगितले. त्यानंतर आरोपीने पिडीत मुलास शाळेच्या मागे असणा-या शौचालयामध्ये नेवून “तुझे अंगावरील कपडे काढ नाहीतर तुझा मर्डर करीन” अशी धमकी देवून मुलाच्या इच्छेविरुध्द जबरदस्तीने अनैसर्गिक अत्याचार केला. घडलेला प्रकार पिडीत मुलाने त्याच्या वडिलांना सांगितल्यानंतर त्याच्या वडिलांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.

सदरच्या तक्रारीवरुन विश्रामबाग पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. डी. आंबले यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर केसची सुनावणी विशेष अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डि. एस. हातरोटे यांच्या न्यायालयात सुरु होती.

याकामी सरकार पक्षातर्फे एकुण पाच साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी पिडीत मुलगा, त्याचे वडिल व वैदयकिय अधिकारी प्रतिक चोटालिया यांची साक्ष अत्यंत महत्वाची ठरली. उपलब्ध साक्षीपुराव्याचे आधारे यातील आरोपीस भारतीय दंड संहिता कलम ३७७ अन्वये दोषी धरून पाच वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा तसेच पोक्सो कायदयाचे कलम ६ अन्वये वीस वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. याकामी सरकारपक्षातर्फे अति, जिल्हा सरकारी वकिल रियाज एस. जमादार यांनी काम पाहिले.

Leave a Comment