कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कापिल (ता. कराड) येथील विद्यमान सरपंच यांनी ग्रामपंचायतीमध्ये पदाचा गैरवापर करून चुकीची कामे केली असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी गणेश पवार यांनी केली आहे. कराड येथील पंचायत समितीच्या समोर अमरण उपोषण गणेश पवार यांनी सुरू केले आहे. ते म्हणाले, कापील ग्रामपंचायत विद्यमान सरपंचांनी गावातील लोकांना नळपाणीपुरवठा मीटर एकच दररोज उपलब्ध करून दिलेले नाहीत. जिल्हा परिषद सातारा यांच्याकडे कापिल पाणीपुरवठा योजनेचे दप्तर हस्तांतरण करताना, ग्रामसेवक यांची सही खोटी केलेली आहे.
ग्रामपंचायत ग्रामसेवक यांनी त्याबाबत गुन्हा दाखल करावा, अन्यथा ग्रामसेवकास निलंबित करून त्याची चौकशी करण्यात यावी.कापिल गावांमध्ये झालेल्या चोवीस बाय सात पाणी योजनेत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करावी. तसेच पाणी योजनेमध्ये मळ्यातील लोकांना विचारात घेतलेले नसून त्यांना योजनेपासून वंचित का ठेवण्यात आले आहे? याचीही चौकशी करावी.
तसेच शिवरत्न कंट्रक्शन यांनी ग्रामपंचायत हद्दीत केलेले गटर सुस्थितीत करून दिलेले नाहीत, याचीही चौकशी करण्यात यावी अशी मागणी गणेश तुकाराम पवार यांनी केलेली आहे. यासाठी पंचायत समितीच्या समोर आमरण उपोषणास सोमवार पासून सुरुवात केली आहे. माझ्या मागण्या पूर्ण होईपर्यंत हे उपोषण मागे घेतले जाणार नाही, अशी माहिती गणेश पवार यांनी दिली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’