मिशेन बिगेन अगेन ः संचारबंदीच्या मनाई आदेशात 30 एप्रिलपर्यंत वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | राज्य शासनाच्या आदेशानुसार मिशन बिगेन अगेन अंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात संचारबंदीचा कालावधी वाढविण्‍यात आलेला आहे. औरंगाबाद जिल्ह्यासाठी शहर व ग्रामीण भागात  30 एप्रिलपर्यंत रात्री 8 ते सकाळी 7 या कालावधीसाठी संचारबंदी, मनाई आदेश लागू राहणार आहेत. त्यामध्ये या आदेशामध्ये खालील प्रमाणे अंशत: बदत करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाव्दारे काढण्यात आले आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात 15 एप्रिलऐवजी आता 30 एप्रिलपर्यंत संचारबंदी, मनाई आदेश लागू करण्यात येत आहेत. तसेच या कालावधीअंतर्गत येणाऱ्या प्रत्येक शनिवार व रविवार संपूर्णत: मनाई (प्रतिबंध) (अत्यावश्यक वस्तू व सेवा वगळता) असेल. जिल्ह्यात कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक कारण/सेवा वगळता रात्री 8 ते सकाळी 7 यावेळात संचार करण्यास प्रतिबंध असेल. मात्र यामधून जीवनावश्यक वस्तूंचा (दूध, भाजीपाला, फळे इ) पुरवठा करणारे, वृत्तपत्र सेवा व अत्यावश्यक सेवा पुरविणारे आस्थापना/व्यक्तींना, कोवीड लसीकरणासाठी जाणाऱ्या नागरिकांना व त्यांच्या वाहनांना वगळण्यात येत आहे. तसेच ज्या उद्योगाचे शिफ्टमध्ये कामकाज चालते, अशा संबंधित आस्थापणेवरील कर्मचाऱ्यांना व त्यांची ने-आण करणाऱ्या वाहनांना या आदेशामधून वगळण्यात येत आहे.

घाऊक भाजीपाला व फळ विक्रेते यांची, जाधवमंडी येथे एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये, यासाठी महापालिका औरंगाबाद यांच्या क्षेत्रातील 9 झोप मधील 41 ठिकाणी विक्री स्पॉट, वार्ड ऑफिसर यांच्या निगराणी खाली निश्चित करण्यात आले आहेत. तरी या विक्रेत्यांना कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन बंधनकारक करण्यात येऊन याबाबत त्यांना वगळण्यात येत आहे.

जिल्हृयात सर्व स्विमिंग पूल, स्पा, व्यायाम शाळा (जिम), हॉटेल, रेस्टॉरंट, परमीट रुम/बार, फुंड कोर्ट, मॉल, नाष्टा सेंटर इ. आस्थापना 30 एप्रिल पर्यंत संपूर्णपणे बंद राहतील. तथापि, हॉटेल, रेस्टॉरंट, नाष्टा सेंटर इ. यांच्या मार्फत पार्सल सेवा, घरपोच सेवा रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहील. रस्त्यांवरील खाद्य पदार्थांचे स्टॉल (टपऱ्या) येथे अन्न पदार्थांचे सेवन करण्यास प्रतिबंध राहील. फक्त पार्सल घेऊन जाण्यास परवानगी राहील. सर्व ज्युस सेंटर, व रसवंतीगृहे बंद राहतील, फक्त पार्संल घेऊन जाण्यास रात्री 8 पर्यंत परवानगी राहील.

औरंगाबाद जिल्ह्यात सर्व आठवडे बाजार तसेच सर्व प्रकारचे कोचिंग क्लासेस 30 एप्रिलपर्यंत संपूर्ण बंद राहतील. नियोजित बैठका ऑनलाईन माध्यमातून घेण्यास प्राधान्य देण्यात यावे. वरील अंशत: बदल वगळता जिल्हा प्रशासनाने 27 मार्च रोजीच्या आदेशामधील इतर सर्व अटी व शर्ती कायम राहणार आहेत. या आदेशाचे पालन न करणाऱ्य व्यक्ती, संस्था अथवा समूह यांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाअंतर्गत विविध कलमान्वये कारवाई करण्यात येईल.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Grou

Leave a Comment