हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी शिवसेनेतून बंडखोरी करत महाविकास आघाडी सरकार पाडले आणि राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं. भाजप आमदारांची संख्या जास्त असल्याने त्यावेळी सर्वाना असं वाटत होते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, परंतु अवघ्या ५० आमदारांचा पाठिंबा असलेले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने सर्वानाच धक्का बसला. परंतु एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होणार हे आधीच ठरलं होत, फक्त ते फडणवीसांना माहित नव्हतं असा मोठा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे.
आवाज कुणाचा’ या ठाकरे गटाच्या कार्यक्रमात बोलताना नितीन देशमुख यांनी अनेक मोठमोठे खुलासे केले. ते म्हणाले, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होणार हे बंडखोरीच्या आधी १ महिनाच फिक्स झालं होते. देवेंद्र फडणवीस याना मात्र हे माहित नव्हतं. त्यांना फक्त सत्तांतर होणार येव्हडच माहित होत. आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार हे फक्त शिंदे याना आणि अमित शाह याना माहित होत. एकनाथ शिंदे स्वतः मला म्हणाले होते कि मुख्यमंत्री मी असणार असा गौप्यस्फोट नितीन देशमुख यांनी केला आहे. त्यामुळे पुनः एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर ६ महिन्यातच बंडखोरीला सुरुवात –
दरम्यान, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर अवघ्या ६-७ महिन्यांनी बंडखोरी आणि सत्तांतराला सुरुवात झाली होती. आम्हाला त्यावेळीच त्याची कुण कुण लागली होती. पण एवढ्या मोठ्या संख्येने आमदार फुटतील याचा अंदाज आला नाही. जास्तीत २० ते २२ आमदार जातील आणि सरकारवर याचा काही परिणाम होणार नाही, असं आम्हाला वाटतं होतं, असे नितीन देशमुख यांनी सांगितलं.