आमदार रवी राणा यांनी अभियंत्याला चांगलेच फटकारले, ठक संपेपर्यंत बसवले खाली 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई

अमरावती जिल्ह्यामध्ये सध्या पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर आहे. परीसरातील अनेक भागात पाण्याचा तुटवडा भासत आहे. लोकांना पाणी सोडले जात नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. यासंदर्भात बडनेराचे आमदार रवी राणा यांनी आज झालेल्या पाणी टंचाईच्या बैठकीत संबंधित अभियंत्याला चांगलेच फटकारले. अभियंता पुरोहित यांना संपूर्ण बैठकीत खाली बसवून त्यांनी त्यांची चांगलीच खबर घेतली. यामुळे उपस्थित अभिकारी, कर्मचारी चांगलेच भयभीत झाले होते.

“लोकांना प्यायचं पाणी देऊ शकत नाही आपण? ७० हजार रुपये पगार घेता आणि लोकांना पाणी सोडता येत नाही तुम्हाला? यानंतर जर कुणाची तक्रार आली तर कारवाई केली जाईल. आणि काम करायचे नसेल तर राजीनामा द्या आणि निघून जा काम न करणाऱ्या लोकांची आम्हाला काहीच गरज नाही. आम्हाला काम करणारे लोकच लोकच हॅव आहेत कामचोर नको आहेत. प्रत्येक गावातील टाकीचे नियोजन, त्यांना पाणी सोडणे अशा सर्व गोष्टी करण्याचा दम दिला.” तसेच उपस्थित अधिकाऱ्याला याचा अहवाल देण्याचेही आदेश दिले.

उन्हाळ्याच्या तीव्रतेने त्रस्त नागरिकांना पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू नये यासाठी आणि पाणीटंचाई वर मात करण्यासाठी आमदार रवी राणा यांनी महानगरपालिका, जिल्हा प्रशासन व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची  संयुक्त बैठक घेतली होती. कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यातील नागरिक पाण्यापासून वंचित राहणार नाही यासाठी अधिकारी व कर्मचारी यांनी दक्ष राहावे, हलगर्जीपणा , हयगय खपवून घेतली जाणार नाही असा दम आमदार रवी राणा यांनी भरला व भर सभेत शाखा अभियंता पुरोहित यांना खडसावले व बैठक संपेपर्यंत जमिनीवर बसवून ठेवल्याने मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.