शिवजयंती साजरी करणार नाही तर काय टिपू सुलतानची साजरी करणार का ?? ; मनसेचा संतप्त सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची तारखेनुसारची जयंती ही १९ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते. मात्र, यंदा शिवजयंती साजरी करण्यावर कोरोनाचं सावट कायम आहे. कोरोना आटोक्यात आला असला तरी शिवजयंतीसाठी सरकार कडून निर्बंध लावण्यात आले असल्याने शिवभक्तांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

बुधवारी राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढल्यामुळे गृहविभागानं नव्याने आदेश बजावून शिवजयंती साजरी करण्यावर निर्बंध घातले आहेत. भाजप, मनसेसह राज्यातील शिवभक्तांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे.

दरम्यान, मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं आहे. “शिवजयंती हा आपला वर्षा तील सर्वात मोठा सण. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपण आहोत त्यांची जयंती साजरी करतांना कसली बंधने टाकताय. आजान स्पर्धा भरविणारे, बार ची वेळ सारखी वाढवून देणारे, विविध निवडणुकीत कोरोना नियमाची पायमल्ली चालते आणि शिवजयंती ला नियमावली.” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

पुढे ते म्हणाले, “आपल्या महाराष्ट्रात शिवजयंती साजरी करणार नाही तर काय टिपू सुलतान ची साजरी करणार का? वेळीच हि नियमावली बदला, जनतेला गृहीत धरू नका.”असा इशारा देखील महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment