पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई । पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचं नाव आल्याने शिवसेना अडचणीत आलीय. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर थेट कॅमेऱ्यासमोर न बोलता ऑफ दी रेकॉर्ड प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्रीच या प्रकरणी बोलतील असं राऊत यांनी म्हटलं असल्याचे वृत्त टीव्ही ९ वृत्तवाहिनीने दिलंय.

शिवसेना नेते संजय राऊत यांना प्रसारमाध्यमांनी गाठून पूजा चव्हाण प्रकरणी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण राऊत यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच या प्रकरणावर प्रतिक्रिया देतील, असं त्यांनी ऑफ द रेकॉर्ड सांगून या प्रकरणावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला. त्यानंतर राऊत हे नाशिकच्या दिशेने रवाना झाले. त्यामुळे मुख्यमंत्री या प्रकरणावर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी काल उशिरा याप्रकरणाची सर्व माहिती घेतली आहे. त्यामुळे ते आता काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री हे आधी संजय राठोड यांच्याशी बोलून त्यांची बाजू ऐकून घेतील. त्यानंतरच उचित निर्णय घेणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर आता कथित 11 ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या. या क्लिपमधील आवाज शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचा असल्याचं सांगत या प्रकरणी राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली होती. तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांन थेट पोलीस महासंचालकांनाच पत्रं लिहून या प्रकरणी कारवाईची मागणी केली होती. त्यामुळे राठोड यांच्या अडचणीत वाढ झाली होती. तर राठोड यांच्यावर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढला आहे.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

You might also like