हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते तथा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यासाठी थोड्या वेळातच दाखल होत आहेत. शिवसेनेकडूनही आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. आज प्रथम लखनऊ विमानतळावर दाखल होतील. दरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा रद्द केल्यानंतर आदित्य ठाकरे यांचा हा दौरा होत आहे. त्यामुळे मनसेचे नेते गजानन कळले यांनी ट्विटच्या माध्यमातून आदित्य ठाकरेंच्या या दौऱ्यावर टीका केली आहे.
मनसेचे नेते गजानन काळे यांनी नुकतेच एक ट्विट केले असून त्यात त्यांनी “मुँह में राम … बगल में निजाम …,” असे घणाघाती टीका केली आहे. दरम्यान त्यांच्या या ट्विटनंतर आता शिवसेनेकडून आता अकाय प्रतिक्रिया देणार याकडे सेवेचे लक्ष लागले आहे.
मनसेकडून यापूर्वीही आदित्य ठाकरेयाच्या दौऱ्यावरून टीका करण्यात आली होती. दरम्यान आता मनसेकडून पुन्हा आदित्य ठाकरेंवर निशाणा साधण्यात आलेला आहे. त्यामुळे आया दौऱ्यात आता आदित्य ठाकरे काय बोलणार? हे पहावे लागणार आहे.
मुँह में राम … बगल में निजाम … l #अयोध्यावारी
— Gajanan Kale (@MeGajananKale) June 15, 2022
असा असणार आदित्य यांचा दौरा
– सकाळी 11 वाजता आदित्य ठाकरेंचं लखनऊ विमानतळावर आगमन
-दुपारी 1.30 वाजता- अयोध्येत आगमन. इस्कॉन मंदिराला भेट
-दुपारी 2.30 ते 3.30 वाजण्याच्या दरम्यान हॉटेल पंचशील येथे पत्रकार परिषद
-दुपारी 4.30 वाजता- हनुमान गढी येथे दर्शन घेणार
– संध्याकाळी 5 वाजता- प्रभू श्री रामाचं दर्शन
-संध्याकाळी 6 वाजता- लक्ष्मण किल्ला येथे भेट देणार
-संध्याकाळी 6.45 वाजता- शरयू नदीच्या घाटावर आरती
-संध्याकाळी 7.30 वाजता- लखनऊला प्रस्थान