हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असं वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोषारी यांनी केल्यानंतर राज्यात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. राज्यपालांच्या या विधानानंतर मनसे आक्रमक झाली असून मनसेचे नेते गजानन काळे यांनी तीव्र शब्दात कोषारी यांच्यावर टीका केली आहे. नावात भगतसिंग इतकेच यांच कर्तृत्व बाकी यांचा वरचा कोश रिकामाच दिसतोय अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे
पुरे आता …यांनी आता घरी बसावं … मराठी माणसाला ज्ञान पाजळण्याच्या भानगडीत पडू नये … नावात भगतसिंग इतकेच यांच कर्तृत्व बाकी वरचा कोश रिकामाच दिसतोय यांचा … अस ट्विट करत गजानन काळे यांनी राज्यपालांवर तोफ डागली.
पुरे आता …
यांनी आता घरी बसावं …
मराठी माणसाला ज्ञान पाजळण्याच्या भानगडीत पडू नये …
नावात भगतसिंग इतकेच यांच कर्तृत्व बाकी वरचा कोश रिकामाच दिसतोय यांचा …#संतापजनक #निषेध pic.twitter.com/wGredZLmVJ— Gajanan Kale (@MeGajananKale) July 30, 2022
दरम्यान संदीप देशपांडे यांनीही राज्यपालांवर जोरदार टीका केली. मराठी माणूस आणि महारष्ट्रामुळे इतरांना फायदा झाला आहे. इतरांमुळे महाराष्ट्राची प्रगती झाली नाही असे म्हणत ज्या गोष्टीचा इतिहास आपल्याला कळत नाही, त्याविषयी बोलू नये अशा शब्दांत संदीप देशपांडे यांनी राज्यपालांचा समाचार घेतला.
50 खोकेवाले आता कोणत्या झाडी डोंगरात लपून बसलेत.? राज्यपालांच्या विधानावरून संजय राऊत आक्रमक
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/tXVNuG7CEJ@HelloMaharashtr @rautsanjay61
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) July 30, 2022
राज्यपाल नेमकं काय म्हणाले-
मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात स्थानिक चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले. यावेळी आपल्या भाषणात राज्यपाल म्हणाले, कधी कधी मी इथल्या लोकांना बोलतो महाराष्ट्रात, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यानंतर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही. मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. मात्र मुंबईची ती ओळखही उरणार नाही, असेही भगसिंह कोश्यारींनी म्हंटल.