हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले असल्यापासून व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद स्वीकारल्यापासून विरोधकांकडून निशाणा साधला जात आहे. दरम्यान राज्यावर आता अंधाराच्या संकटावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “स्वाभिमान विकून वसुलीसाठी चालली आघाडीची सेंटीग …राज्यात केला अंधार आता मागवलीय इटलीची लायटिंग…मामुचं_इटलीप्रेम,” अशी देशपांडे यांनी टीका केली आहे.
मुंबई येथील शिवाजी पार्क परिसरात महापालिकेच्या माध्यमातून विद्युत दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला सर्वज्ञात आलेला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहले आहे की, स्वाभिमान विकून वसुलीसाठी चालली आघाडीची सेंटीग …राज्यात केला अंधार आता मागवलीय इटलीची लायटिंग…मामुचं_इटलीप्रेम,” असे देशपांडे यांनी म्हंटले आहे.
स्वाभिमान विकून वसुलीसाठी चालली आघाडीची सेंटीग …
राज्यात केला अंधार आता मागवलीय इटलीची लायटिंग…#मामुचं_इटलीप्रेम pic.twitter.com/Q6PIuqZxyP— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) November 3, 2021
मुंबई येथील शिवाजी पार्क परिसरात विद्युत दिव्यांची रोषणाई करण्यात आल्यानंतर महापालिकेने प्रसिद्धी पत्रक काढून माहितीही दिली आहे. त्यानुसार दिव्यांसाठी सव्वा कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यात पाच वर्षांचा देखभाल खर्च समाविष्ट आहे, असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.