अखेर मनसे विधानसभा निवडणूक लढणार ; राज ठाकरेंनी मागवली इच्छुकांची यादी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | राज ठाकरे यांची मनसे आता विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मनसे महाराष्ट्र विधानसभेच्या १०० जागा लढण्याची शक्यता आहे. त्या संदर्भात राज ठाकरे यांनी ‘कृष्णकुंज’वर विभाग प्रमुखांची बैठक बोलावली होती. त्यांनी या बैठकीत निवडणुकीला सामोरे जाण्यासंदर्भात बातचीत केली आहे.

मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, सोलापूर, औरंगाबाद, हिंगोली, जळगाव आदी जिल्ह्यात मनसे विधानसभेची निवडणूक लढणार असल्याचे बोलले जाते आहे. या जिल्ह्यात निवडून येण्याच्या स्थितीत असलेल्या विधानसभा मतदारसंघात मनसे आपले नशीब अजमावणार आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीने राज ठाकरे यांना सोबत घेण्यास नकार दिल्याने राज ठाकरे यांनी वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला आहे. मनसेने जर निवडणूक लढवली नसती तर २०२४ च्या निवडणुकीपर्यंत मनसेचा जनाधार कायम राहिला नसता. त्यामुळे आपण नलढता हारण्यापेक्षा लढून हारु असा मतप्रवाह मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये होता. त्याच मतप्रवाहाला लक्षात घेऊन राज ठाकरे यांनी निवडणूक लढण्याचे ठरवले आहे.