हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी मुंबई , नाशिक आणि ठाणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने कंबर कसली असून 2 फेब्रुवारी रोजी बांद्रा एमआयजी क्लब येथे सकाळी अकरा वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा होणार आहे.
नाशिक, ठाणे, मुंबई येथील परिस्थितीचा आढावा राज ठाकरे पधाधिकाऱ्यांकडून घेणार असल्याचे समजते. शिवाय यावेळी राज ठाकरे उपस्थित कार्यकर्त्यांना कानमंत्रही देणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, राज्यात शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी असल्याने त्यांना रोखणं अवघड बनलं आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसे आणि भाजपमध्ये युती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आगामी काळात माहाराष्ट्राचे राजकारण नेमकं कुठे जातंय हे पाहावं लागेल