हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यां सोमवारी पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी निधन झालं आहे. बाबासाहेबांवर मागील काही दिवसांपासून उपचार सुरु होते. ते १०० वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे भावुक झाले असून ट्विट करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
राज ठाकरे म्हणाले , बाबासाहेबांनी आपलं आयुष्य शिवचरित्र सांगण्यासाठी खर्च केलं. परंतु असं असतानाही वर्तमानातील प्रश्न आणि भविष्यातली आव्हानं ह्याबाबत त्यांच्याकडून कायमच मार्गदर्शन मिळत राहिलं. माझ्या व्यक्तिगत आयुष्यात ते माझे मार्गदर्शक तर होतेच, पण मला पितृतुल्यही होते”.
इतिहास संशोधक, शिवचरित्रकार, महाराष्ट्र भूषण सन्माननीय बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विनम्र श्रद्धांजली ! #शिवशाहीर #श्रद्धांजली pic.twitter.com/x7xRdQzalr
— Raj Thackeray (@RajThackeray) November 15, 2021
बाबासाहेब मला नेहमी सांगत, “महाराजांचा जिथे जिथे पदस्पर्श झाला आहे, तिथे तिथे मी आजपर्यंत अनेकदा गेलो आहे. आता फक्त एकच जागा उरली आहे ती म्हणजे महाराज जिथे गेले आहेत तिथे जायची”. शिवछत्रपती महाराजांचा सेवक आज साक्षात छत्रपतींची सेवा करण्यासाठी निघाला. इतिहास संशोधक, शिवचरित्रकार, महाराष्ट्र भूषण, सन्माननीय बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विनम्र श्रद्धांजली”.अशा शब्दात राज ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या