शरद पवारच जातीपातीच्या राजकारणाला जबाबदार; राज ठाकरेंचा आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील जातीपातीच्या राजकारणाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार हेच जबाबदार आहेत असा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. राज ठाकरे हे गुढीपाडव्यानिमित्त मुंबईतील शिवाजी पार्कवर आयोजित सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी ठाकरे सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेस वर जोरदार टीका केली

राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र हा जातीपातींमध्ये विभागलेला राहील, ही गोष्ट काही लोकांना हवी आहे.  शरद पवार यांची हीच इच्छा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतरच राज्यात जातीवाद फोफावला. 1999 ला राष्ट्रवादीचा जन्म झाला. त्यानंतर महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण सुरू झालं. या आधी जात नव्हती का तर होती. पण त्यावेळी जातीचा अभिमान होता.

1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला. त्यानंतर दुसऱ्या जातीबद्दल द्वेष करायला लावला गेला. मराठा आरक्षण आणि अन्य मुद्द्यांवरून आमिषं दाखवून समाजात फूट पाडण्यात आली. ज्या छत्रपती शिवरायाने स्वराज्यासाठी एक व्हा सांगितलं. तिथे जातीपातीवरून वाद सुरू आहे. राजकारण सुरू आहे. जातीतून बाहेर नाही पडणार तर हिंदू कधी होणार? असा सवालही राज यांनी यावेळी विचारला

Leave a Comment