रेमडेसिवीरची खरेदी आणि वितरण राज्यांकडे द्यावे; राज ठाकरेंची पत्र लिहून मोदींना विनंती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील आणि राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. रेमडेसिवीरची खरेदी आणि वितरण राज्यांकडे द्यावे अशी मागणी त्यांनी आपल्या पत्रातून केली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी जनतेला संबोधित करताना राज्यांना देखील काही सूचना केल्या होत्या. आणि या भयानक संकटाचा सामना करण्यासाठी मार्गदर्शन देखील केले जाते. मग अस असताना रेमडेसिवीर ची खरेदी आणि वितरण केंद्राने स्वतःकडे ठेवण्याचे प्रयोजन काय ? असा सवाल राज ठाकरे यांनी पत्रातून केला आहे.

 

कोरोनाविरूध्दच्या ह्या लढाईत केंद्राची भूमिका ही सहाय्यकाची, समन्वयाची आणि मार्गदर्शनाची आहे. ह्यात प्रत्यक्षात अग्रणी आहे राज्य सरकारांची यंत्रणा. अशा परिस्थितीत केंद्रानं रेमडेसिविरच्या वितरणाची यंत्रणा स्वतःकडे ठेवू नये. ह्यातून प्रत्यक्ष काम करतात अशा यंत्रणांवरचा अविश्वास तर दिसतोच शिवाय त्यांच्या कडे असलेल्या स्थानिक परिस्थितीच्या आकलनाला आपण कमी लेखतो आहे असं दिसतं.

याबाबतीत माझी आपल्याला नम्र विनंती आहे की रेमडेसिविर कसं घ्यायचं, कुठे, कसं वितरित करायचं ह्याची संपूर्ण जबाबदारी आपण राज्यांकडे सोपवावी. ते काम खरंतर केंद्राचं नाही. असे राज ठाकरे यांनी म्हंटल.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment