व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर कोरोनाचा शिरकाव; आगामी कार्यक्रम रद्द

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान शिवतीर्थ येथे कोरोनाचा शिरकाव झाला असून एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर खबरदारी म्हणून सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. तसेच राज ठाकरे यांनी आगामी १० दिवसांचे कार्यक्रम रद्द केले आहेत.

सुरक्षा ताफ्यातील एकाला कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आल्यानंतर राज ठाकरे यांच्याकडून पुढील 10 दिवसातील सर्व कार्यक्रम रद्द केले असल्याची माहिती आहे. राज ठाकरेंनी त्यांच्या सर्व भेटी रद्द केल्या आहेत, अशी माहिती आहे. गतवर्षी राज ठाकरेंना देखील कोरोनाची लागण झाली होती.

शिवतीर्थ वरील इतर कर्मचाऱ्यांची देखील खबरदारी म्हणून कोरोना चाचणी केली असून कर्मचाऱ्यांचे कोरोना अहवाल अद्याप प्राप्त झाले नाही. या कर्मचाऱ्यांचा चाचणी अहवाल आज किंवा उद्यापर्यंत येण्याची शक्यता आहे