मुंबई आयुक्तांकडे 100 कोटी मागितले तर इतर शहरातील आयुक्तांकडे किती मागितले? – राज ठाकरेंचा सवाल

0
39
anil deshmukh raj thackarey
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : जर गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना १०० कोटी रुपये मागत असतील तर राज्यातील इतर शहरातील किती आयुक्तांकडे किती मागितले ह्याचा तपशील पण जनतेला कळला पाहिजे अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सदर प्रकरणाची केंद्राने सखोल चौकशी करायला हवी कारण जशी चौकशी पुढे जाईल तशा फटाक्यांची माळ लागेल आणि अनेक धक्कादायक नावं बाहेर येतील असंही राज म्हणालेत. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या मंत्रीपदाचा तात्काळ राजीनामा द्यायला हवा अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे.

दरम्यान, माझी माध्यमांना विनंती आहे की त्यांनी हा विषय गंभीर आहे ह्याची जाणीव ठेवून तो विषय भरकटू देऊ नये, आणि हा प्रकार कोणाच्या सांगण्यावरून केला ह्याच्या मागे लागावं. तसेच माझी केंद्र सरकारला विनंती आहे की त्यांनी ह्या प्रकरणाची सखोल चौकशी करायला हवी कारण ह्या प्रकरणाचा राज्यात निष्पक्ष तपास होईल ह्याची मला अजिबात खात्री नाही. जर केंद्राने पण नीट चौकशी नाही केली तर मात्र जनतेचा विश्वास कायमचा उडेल. आणि आपण अराजकाच्या दिशेने जाऊ असं राज म्हणाले.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here