मुंबईसह राज्यात मनसे स्वबळावर लढणार : संदीप देशपांडे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | गणेशोत्स काळात भाजप व शिंदे गटाच्या नेत्याच्या मनसेचे राज ठाकरे यांच्या घरी फेऱ्या वाढल्या होत्या. त्यामुळे भाजप किंवा शिंदे गटासोबत आगामी निवडणुकात मनसे सोबत जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. युतीबाबत अनेकदा राजकीय नेत्याकडूनही मते व्यक्त केली जात होती. त्यामुळे मनसे, शिंदे गट आणि भाजपची महापालिकेत युती होईल असं सांगितलं जात होतं. परंतु यावर आता संदीप देशपांडे महापालिका निवडणुकात मनसे कुणाशीही युती न करता स्वबळाचा नारा दिला आहे.

संदीप देशपांडे म्हणाले, राज ठाकरेंच्या आदेशानुसार सर्व जागा लढण्याची तयारी आम्ही सुरु केली आहे. आगामी काळातल्या सर्व महानगरपालिका आम्ही स्वबळावर लढवणार आहोत. या आधी देखील आम्ही स्वबळावर निवडणुका लढल्या होत्या. आम्ही मुंबईत 227 जागांवर उमेदवार उभे करणार आहोत.

विदर्भाचा दाैरा पक्ष वाढीसाठी

मनसे स्वतंत्र आहे, आम्ही कुणासोबतही न जाण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही सर्वच महापालिका निवडणुकीत आमची ताकद आजमावणार आहोत. युती हा जर तर चा विषय आहे. आमची स्वबळावर लढण्याची तयारी आहे. आमचा विदर्भाचा दौरा सुरू होतोय. पक्ष वाढीसाठी हा आमचा दौरा असल्याचेही संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले.