कोयना, कृष्णा नदीकाठी सावधान : धरणातून 32 हजार 581 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. सध्या धरणात 103. 84 टीएमसी पाणीसाठा साठलेला आहे. धरणात सध्या 38 हजार 10 क्युसेस पाण्याची आवक होत आहे. काल कोयना धरणातून 13 हजार 941 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला होता. आता यामध्ये वाढ करून 32 हजार 581 क्युसेस पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे कोयना व कृष्णा नदीपात्रातील पाणीपातळीत मोठी वाढ होणार आहे. तेव्हा नदीकाठच्या गावांनी सावधानता बाळगावी, असा इशारा कोयना धरण व्यवस्थापनाने दिला आहे.

मंगळवारी दि. 13 रोजी दुपारी 2 वाजता कोयना धरणाचे 6 वक्रदरवाजे 1 फुट 6 इंच उघडून 12 हजार 891 क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आला होता. परंतु पावसाचा जोर वाढल्याने धरण व्यवस्थापनाने 24 तासांच्या आत पुन्हा सहाही वक्र दरवाजे 3 फूट 6 इंचानी उचलून पाण्याचा विसर्ग वाढविला आहे. आज सकाळी 11 वाजता धरणाचे दरवाजे उचलेले आहेत.

कोयना पाणलोट क्षेत्रातील कोयना क्षेत्रात 106, नवजा 137 तर महाबळेश्वर येथे 116 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. धरण पायथा विद्युत गृहामधून 1050 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. तर कोयना धरणाच्या वक्र दरवाजातून नदीपात्रात एकूण 31 हजार 531 असा एकूण 32 हजार 581 क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे कोयना, कृष्णा नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.