हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। भारतासहित जगभरात कोरोना विषाणूचे संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढते आहे. सगळीकडेच साबणाने अथवा अल्कोहोलयुक्त सॅनिटायझरने हात धुवायला सांगितले जाते आहे. संक्रमणाच्या भीतीने मोबाईलही सॅनिटाईझ केले जात आहेत. काही जण तरी वेट टिश्यू देखील वापरत आहेत. असे केल्यामुळे मोबाईलची स्क्रीन, हेडफोन आणि स्पिकरदेखील खराब होते आहे.
दिल्लीत मोबाईल रिपेअरिंग दुकानांच्या मालकांनी हल्ली सॅनिटायझरमुळे मोबाईलचे नुकसान झालेले लोक मोठ्या प्रमाणात येत असल्याचे सांगितले आहे. काही लोक मोबाईल असा साफ करत आहेत की मोबाईलच्या जॅक मध्ये सॅनिटायझर जाऊन शॉर्ट सर्किट होते आहे अशी माहिती समोर आली आहे. काही लोकांचे मोबाईलचे डिस्प्ले आणि कॅमेरा लेन्स ही सॅनिटायझरमुळे खराब होते आहे.
मोबाईल साफ करण्यासाठी बाजारात उपलब्ध असणाऱ्या ७०% अल्कोहोल युक्त मेडिकल वाईप्सचा वापर करावा, ज्यामुळे मोबाईल खराब होणार नाही अशी माहिती दिली आहे. या वाईप्सच्या साहाय्याने फोनच्या कोपऱ्यामध्येही सफाई करता येते. फोन साफ करत असताना तो ऑफ करून कापसाचा बोळा रबिंग अल्कोहोल मध्ये बुडवून मग मोबाईल साफ करावा म्हणजे तो खराब होणार नाही.