पुणे : हॅलो महाराष्ट्र – मुंबईसह, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात श्री स्वामी समर्थ मठांची स्थापना करणारे नवनीत्यानंद उर्फ मोडक महाराज (modak maharaj) यांच्या गाडीचा भीषण अपघात होऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पुणे-सातारा महामार्गावर हा अपघात झाला आहे. सततच्या प्रवासामुळे कार चालकाला झोप लागल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
काय घडले नेमके?
कल्याण मठात शेजारती झाल्यानंतर येथून मोडक महाराज (modak maharaj) रविवारी रात्री उशिरा सिंधुदुर्ग जिल्ह्यात येण्यासाठी निघाले होते. त्यापूर्वी ते काशी येथून कल्याण येथे आले होते. यावेळी पुणे-सातारा रस्त्यावर त्यांची गाडी दुभाजकाला धडकली आणि हा अपघात झाला. महाराजांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी कल्याण येथील श्री स्वामी समर्थ मठात ठेवण्यात येणार आहे.
मोडक महाराज (modak maharaj) यांनी सुरुवातीला कल्याण येथे मठाची स्थापना केली होती. त्यानंतर मुरुड-जंजिरा, अलिबाग, ठाणे, डोंबिवली व सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांनी डोंगरपाल-डिंगणे, तुळस, कलंबिस्त, आंबोली, उपवडे, झाराप, डिगस, देवगड येथे मठांची स्थापना केली होती. त्यांच्या अपघाती निधनाने त्यांचे भक्तगण शोकसागरात बुडाले आहेत. त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भक्तगण कल्याण येथे जाण्यासाठी रवाना झाले आहेत.
हे पण वाचा :
Jio Fiber च्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 14 OTT Apps चे फायदे
Smartphones मधील मागचा कॅमेरा नेहमी डाव्या बाजूलाच का असतो???
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम
RBL Bank च्या ‘या’ क्रेडिट कार्डवरील प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर मिळवा 1% कॅशबॅक
मुलांसाठी बचत खाते उघडण्याचे फायदे जाणून घ्या