कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
पंतप्रधान मोदीजींनी शेतकर्यांच्या शेतीमालाचे भाव दुप्पट करण्याचे जाहीर केले होते, मात्र त्यांना ते शक्य झाले नाही. त्यांनी महापराक्रम पेट्रोल- डिझेलचे भाव दुप्पट करून शेतकर्यांना तसेच सर्वसामान्यांना हैराण करून सोडल्याची टीका बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी केली आहे.
पंजाबराव पाटील यांनी स्वतःच्या दुचाकी गाडीवर मोदी एक्सप्रेसचा बोर्ड लावून 25 रुपये चलो असा बोर्ड लावत पेट्रोल- डिझेलचा निषेध केला आहे. उंडाळे- कराड- उंडाळे असा पर्याय स्वतः शोधलेला आहे. उंडाळे ते कराड 40 रूपये भाडे असताना आम्ही मोटारसायकलवरून 25 रूपयांत नेण्याचे काम आम्ही सुरू केले आहे. असे ते म्हणाले
पूर्वी 50 रूपयांत उंडाळे- कराड प्रवास होत असे आता 100 रूपये लागत आहेत. त्यामुळे दुचाकीवर एक प्रवासी घेवून त्याच्याकडून 25 रूपये घेत असल्याने प्रवासी लगेच येत आहे. आम्ही शोधलेल्या या कल्पनेचा वापर महाराष्ट्रातील जनतेने करावा असे अवाहन पंजाबराव पाटील यांनी केलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’