लोकसभेत खासदारांचे संख्याबळ 1000 करण्याचा केंद्राचा प्रस्ताव?? काँग्रेसचा दावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | लोकसभेत खासदारांचं संख्याबळ वाढवून ते 1000 पर्यंत करण्याचा मोदी सरकारचा घाट असून त्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकार कडून करण्यात आल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी ट्विट करत हा दावा केला आहे.

मनिष तिवारी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “संसदेतील माझ्या काही विश्वासार्ह सहकाऱ्यांनी लोकसभेचं संख्याबळ १००० किंवा त्याहून जास्त वाढवण्याचा भाजपाचा प्रस्ताव असल्याची माहिती दिली आहे. नवीन संसदेचं चेंबर १००० जण बसू शकतील अशा पद्धतीने बांधलं जात आहे. पण हे करण्याआधी लोकासोबत गंभीरपणे यावर चर्चा झाली पाहिजे”.

दरम्यान, सध्या लोकसभेत ५४३ आणि राज्यसभेत २४५ सदस्य आहेत. संसदेची नवी इमारत उभारली जात असून, सरकारने लोकप्रतिनिधींची संख्या वाढवण्याचं संकेत सरकारने दिली आहे. लोकसभा संपूर्ण देशातील नागरिकांचं प्रतिनिधित्व करत असून भविष्यात खासदारांची संख्या वाढवली जाऊ शकते, असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हंटल होत.