केंद्र सरकारने केली जम्मू-काश्मीरसाठी ८० हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । केंद्र सरकारने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं अनुच्छेद ३७० रद्द केलं होतं. त्यानंतर जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आलं होतं. गेल्या काही महिन्यापासून जम्मू-काश्मीरमध्ये ठप्प पडलेल्या अर्थकारणाला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८० हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली आहे. केंद्रशासित प्रदेश घोषित केल्यानंतर जम्मू-काश्मीरची अर्थव्यवस्था रुळावर आणण्याच्या दृष्टीने या घोषणेकडे पहिले जात आहे. याबाबतची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिली आहे.

आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत जम्मू-काश्मीरच्या आर्थिक विकासासाठी ८० हजार कोटींचं पॅकेज देण्यास मंजुरी देण्यात आली. त्याशिवाय माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने अटल जल मिशन योजनेलाही मंजुरी देण्यात आली असून त्यासाठी सहा हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. अटल टनल योजनेसाठीही ४ हजार कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे.

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

हे पण वाचा-

दोषींना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर ७ दिवसांच्या आत फाशी द्या! केंद्राची सर्वोच्च न्यायालयाकडे विनंती

भारतीय लोकशाही घसरली, 10 व्या स्थानावरून थेट 51 व्या स्थानी घसरण

प्रिय ट्रोलर्स, तुम्ही कितीही खोटं बोललात तरी ‘छपाक’ यशस्वी झालाय..!! पहा सविस्तर आकडेवारी