Saturday, March 25, 2023

मोदी सरकारने हटवली शरद पवारांची सुरक्षा

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानाची सुरक्षा केंद्र सरकारनं तडकाफडकी हटविली आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जात आहे. महाराष्ट्रा तील सत्ताबदलाची पार्श्वभूमी सरकारच्या या निर्णयाला असल्याचीही चर्चा आहे.

- Advertisement -

अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सुरक्षा पुरवली जाते. संबंधित व्यक्तीला असलेल्या धोक्याची तीव्रता लक्षात घेऊन याबाबत निर्णय घेतला जातो. वेळोवेळी सुरक्षेचा आढावा घेतला जातो. सुरक्षेत कपात करायची असल्यास संबंधित व्यक्तीला त्याची पूर्वकल्पना दिली जाते. मात्र, शरद पवारांच्या बाबतीत असं काहीही झालेलं नाही. पवारांची सुरक्षा काढण्याचं कुठलंही कारण सरकारनं दिलेलं नाही, असं दिल्लीतील त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आलं आहे.

दिल्लीतील ‘सहा जनपथ’ येथे शरद पवारांचं निवासस्थान आहे. तिथं दिल्ली पोलीस व सीआरपीएफचे प्रत्येकी तीन जवान तैनात होते. २० जानेवारीपासून त्यांना हटवण्यात आलं आहे. पवारांसह आणखी ४० व्यक्तींची सुरक्षा हटवण्यात आल्याची माहितीही पुढं आली आहे.