इतिहासाची पुनरावृत्ती: वाजपेयींनी सभा घेतलेल्या मैदानातच मोदींची सभा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड प्रतिनिधी । ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी परळीत येणार आहेत. परळीत भाजपकडून पंकजा मुंडे, तर राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे या दोघा भावंडात थेट लढत होत आहे. या पार्श्वभूमीवर १७ तारखेला मोदी परळीमध्ये पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ येत येत आहेत. या निमित्तान परळीत पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे. कारण, दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रचारासाठी ज्या मैदानात सभा घेतली होती, त्याच मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही सभा होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. वैद्यनाथ कॉलेजसमोरील मैदानात ही सभा होणार आहे. सभेसाठी पोलीस प्रशासनाकडून गोपीनाथ गड आणि वैद्यनाथ मंदिर या दोन जागांची पाहणी करण्यात आली होती. १९९९ ला वाजपेयींनी गोपीनाथ मुंडे यांच्यासाठी याच मैदानात सभा घेतली होती.

पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी वैद्यनाथ कॉलेजसमोरील भव्य मैदानात तयारी सुरु झाली आहे. अंदाजे २५ एकरातील या जागेत तीन हेलिकॉप्टरसाठी तीन हेलिपॅड अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र सिंघल यांनी गुरुवारी मैदानाची पाहणी केली. त्यांच्यासोबत बीडचे पोलीस अधीक्षक हर्ष पोदारही उपस्थित होते.

इतर काही बातम्या-