वर्धा प्रतिनिधी | लोकसभा निवडणूतिच्या पार्श्ववभूमीवर नरेंद्र मोदी यांनी आजपासून प्रचार सभेला सुरवात केली आहे. वर्धा येथे त्यांची पहिली प्रचार सभा आज असणार होती. या सभेत बोलताना मोदींनी पहिले वाक्य मराठीत बोलून भाषणाला सुरवात केली. ‘महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या वर्धा भूमीला मी शाष्टांग दंडवत घालतो’ हे वाक्य भाषणाच्या सुरवातीला मराठीतून ते बोलले.
महाराष्ट्रातील २०१९ च्या प्रचार सभेला मराठीतील वाक्य बोलून नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील पहिल्या प्रचार सभेतील भाषणाला आज सुरुवात केली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीला नरेंद्र मोदी यांनी वर्ध्यातून प्रचाराला सुरुवात केली होती. तेव्हाची घेतलेली सभा भाजपसाठी लकी ठरली होती म्हणून या वेळी ही भाजपने पहिली सभा वर्ध्यातच घेतली आहे.
वर्ध्याच्या स्वावलंबी मैदानात नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील पहिल्या प्रचार सभेची राळ उडवली आहे. आपल्या सभेची गर्दी बघून आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना नक्कीच रात्री झोप लागणार नाही. ही गर्दी बघून काँग्रेस-राष्ट्रवादीची चांगलीच झोप उडणार आहे असे नरेंद्र मोदींनी म्हणले आहे. असे बोलून मोदींना आपल्या विरोधकांवर हल्लाबोल चढवला आहे.
इतर महत्वाचे-
आज मोदींची वर्ध्यात पहिली सभा होणार