हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण देशात सध्या कोरोनाने हाहाकार माजवला आहे अशातच कोरोना मुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढतच जात आहे. उत्तर प्रदेश आणि बिहार मधून वाहणाऱ्या पवित्र गंगा नदीच्या पात्रात मृतदेहांचा खच पाहायला मिळतो आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्याऐवजी ती गंगा नदीत टाकले गेल्याचे पाहायला मिळालं. उत्तर प्रदेशच्या गाझीपूर जिल्ह्यात तर बिहारच्या बक्सर मध्ये गंगा नदीत हे मृतदेह तरंगताना आढळले या घटनेनंतर सर्वत्र मोदी सरकारवर टीका करण्यात येत आहे. आता राज्यातील काँग्रेसचे नेते बाळू धानोरकर यांनी देखील यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे मोदींच्या नेतृत्वात ‘नमामि गंगे ऐवजी शवामी गंगे’ झाल्याची टीका त्यांनी केली आहे.
याबाबत बाळू धानोरकर यांनी म्हटले आहे की, गंगा नदीत शेकडो मृतदेह प्रवाहात आढळून आल्याची घटना म्हणजे संपूर्ण भारतवासीयांचा जगभरात झालेला अपमान आहे. करोना विरोधी लढ्यात मोदी सरकार विरोधी पक्षांना आणि त्यांच्या सूचनांना सामावून घेण्याचं आवाहन ही धानोरकर यांनी केले आहे.
पंतप्रधानांनी तो गुलाबी चष्मा काढावा
काँग्रेस नेते यांनी देखील मोदींवर टीका केली आहे त्यांनी म्हंटले आहे की, ” नद्यांमध्ये वाहणारे असंख्य मृतदेह,मैलांपर्यंतच्या हॉस्पिटलमध्ये ओळी,लोकांचा जीवन सुरक्षेचा हक्क काढून घेतला जातोय पंतप्रधानजी, तो गुलाबी चषमा , ज्याला सेंट्रल व्हिस्टाशिवाय काहीच दिसत नाही”.आशिया टीका राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.