हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि युक्रेन चे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेन्स्की यांच्यासोबत फोन वर चर्चा केली. सध्या भारतातील हजारो नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांन मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा सुरू केले आहे. या नागरिकांची सुटका करण्याची वेळ द्यावी. त्या दरम्यान दोन्ही देशांनी युद्ध थांबवावे, यासाठी पंतप्रधान मोदी प्रयत्न करत आहेत.
मोदींनी झेलेन्स्कींसोबत ३५ मिनिटं चर्चा केली तर पुतिन यांच्यासोबत मोदींचा कॉल जवळजवळ ५० मिनिटं सुरु होता यावेळी झेलेन्स्की यांनी युद्धाची सारी माहिती मोदी यांना दिली. यावेळी मोदी यांनी रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या चर्चेचे स्वागत केले. शिवाय युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय नागरिक बाहेर काढण्यासाठी मदत करावी, असे आवाहन झेलेन्स्की यांना केले. आतापर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी युक्रेनचे आभारही मानल्याचे समजते
तर दुसरीकडे पुतीन यांच्याशी संवाद साधत मोदींनी त्यानं झेलेन्स्की यांच्यासोबत थेट चर्चा करण्याचे आवाहन केले तसेच सूमीमध्ये अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांच्या लवकरात लवकर सुरक्षित सुटकेवर जोर दिला. यावर, राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनीही पंतप्रधान मोदींना भारतीयांच्या सुरक्षित सुटकेसाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं