मोहाडीत मालवाहतूक गाडी ट्रकची धडक, ट्रॅव्हल्समधीत 3 जण गंभीर जखमी

Accident
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडारा जिल्ह्यात एक भीषण अपघात (Accident) घडला आहे. यामध्ये भरधाव मालवाहतूक गाडीने उभ्या असलेल्या ट्रॅव्हल्सला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली आहे. भंडारा-तुमसर महामार्गावरील मोहाडी तालुक्यातील कुशारी फाट्याजवळ हा अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात मालवाहतूक गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र यात गाडीमालकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या अपघातानंतर (Accident) महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे खोळंबली होती. या अपघातात ट्रॅव्हल्समधील तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हि ट्रॅव्हल्स भंडाऱ्यावरून बालाघाटला जात होती.

मोहाडीतील कुशारी फाट्याजवळ झाला अपघात
मोहाडीवरून कुशारीला जाताना एक फाटा फुटतो. या रस्त्यावर नेहमी अपघात होतात. इथून चार बाजूला चार रस्ते जातात. त्यामुळं या ठिकाणी अपघाताची शक्यता जास्त असते. त्यामुळंच या रस्त्यावरब्रेकर्स लावले आहेत. तरीही भाजीपाल्याची मालवाहतूक करणारा ट्रक खूप घाईमध्ये होता. हीच घाई त्या ट्रकवाल्याला नडली. समोर ट्रॅव्हल्स अचानक थांबली.

त्यामुळं मालवाहतूक करणाऱ्या चालकाने अचानक ब्रेक मारला पण त्याला गाडी कंट्रोल झाली नाही आणि ट्रक बसला धडकून हा अपघात (Accident) झाला. ट्रॅव्हल्स आणि मालवाहतूक गाडीच्या अपघातामुळं काही काळ वाहतूक खोळंबली होती. दोन्ही बाजूला गाड्यांची रांग लागली होती. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी अथक प्रयत्नांनंतर वाहतूक सुरळीत केली.

हे पण वाचा :
‘या’ सरकारी बँकेने वाढवले आपल्या ​​FD चे व्याजदर !!!

दहशतवाद्यांकडून काश्मिरातल्या हिंदू बँक मॅनेजरची गोळ्या झाडून हत्या

IAS ची नोकरी सोडून सुरु केला स्वतःचा व्यवसाय; आज आहे तब्ब्ल 15,000 कोटींच्या कंपनीचा मालक

Maruti Brezza ची ‘ही’ नवीन कार लवकरच होणार लॉंच; दमदार पॉवर आणि मायलेजही

‘या’ कंपनीच्या होम लोनवरील व्याजदरात एका महिन्यात तिसऱ्यांदा वाढ !!!