मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याची पत्नी हसीन जहाँ (Hasin Jahan) कोणत्या ना कोणत्या कारणावरुन नेहमी चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वी मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ (Hasin Jahan) यांच्यातील वाद चर्चेचा विषय ठरला होता. त्यानंतर आता हसीन जहाँने थेट पंतप्रधान मोदींना भारताचं नाव बदला असे आवाहन केले आहे. इंडियाचे नाव हे भारत किंवा हिंदुस्थान ठेवण्याचे आवाहन तिने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना केले आहे. त्यामुळे तिच्या (Hasin Jahan) या अजब मागणीमुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.
काय म्हणाली हसीन जहाँ?
हसीन जहाँने (Hasin Jahan) तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याद्वारे तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना खास आवाहन केलं आहे. आपला देश, आमचा सन्मान. माझं भारतावर प्रेम आहे. आपल्या देशाचे नाव फक्त हिंदुस्थान किंवा भारत असे असले पाहिजे. पंतप्रधान, गृहमंत्र्यांना भारताचे नाव बदलण्याची विनंती केलीआहे. जेणेकरून संपूर्ण जग आपल्या देशाला भारत बनवेल असे ती या व्हिडिओमध्ये म्हणाली आहे.
मोहम्मद शमीही टीमच्या बाहेर
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या क्रिकेटमधून बाहेर आहे. भारतीय संघाला आशिया कप खेळायचा असून टी-20 प्रकारात होणाऱ्या या स्पर्धेत मोहम्मद शमीला स्थान देण्यात आलेले नाही. मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ (Hasin Jahan) यांनी 2014 मध्ये लग्न केलं होतं. त्यानंतर त्यांच्यात वाद झाल्यानंतर ते दोघे बऱ्याच काळापासून वेगळे राहत आहेत.
हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर
सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक
2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!
संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?