हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या विरोधात दाखल केलेली तक्रार मागे घेतल्याचे वृत्त नुकतेच समोर आले होते. मात्र हे वृत्त खोटे असून आपण कोणतीही तक्रार मागे घेतलेली नाही. कोर्टात या प्रकरणी सुनावणी सुरू आहे. अशी माहिती मोहित कंबोज ट्विट करुन दिली आहे. यामध्ये त्यांनी सध्या पसरत असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे देखील सांगितले आहे. कंबोज यांनी दिलेल्या या माहितीमुळे राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
काय आहे प्रकरण?
आर्यन खान प्रकरणामध्ये नवाब मलिक यांनी मोहित कंबोज यांच्यावर गंभीर आरोप लावले होते. मात्र हे सर्व आरोप खोटे असल्याचे सांगत कंबोज यांनी मलिक यांच्याच विरोधात मानहानीची केस दाखल केली होती. या प्रकरणी शिवडी कोर्टात सुनावणी सुरू होती. या सुनावणी वेळी मलिक यांच्या समर्थकांनी न्यायालयात गर्दी जमा करून कोरोना नियमांचे उल्लंघन केले होते. त्यामुळे या सर्व समर्थकांनी विरोधात मोहित कंबोज यांनी तक्रार दाखल केली होती. मात्र या तक्रारीची पोलिसांनी दखल घेतली नसल्याचा आरोप कंबोज यांनी लावला आहे.
My Statement On Today Times Of India Story ! pic.twitter.com/ibCg2o2F7j
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) August 19, 2023
सध्या न्यायालयाने नवाब मलिक यांचा जामीन मंजूर केल्यामुळे कंबोज यांनी देखील त्यांच्या विरोधातील तक्रार मागे घेतल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. तसेच ही केस मागे घेण्यासाठी कंबोज यांनी कोर्टाला विनंती केल्याचे देखील म्हटले जात होते. मात्र आता हे वृत्त कंबोज यांनी फेटाळून लावले आहे. “आपण नवाब मलिक यांच्या विरोधातील कोणतीही केस मागे घेतलेली नाही” अशी माहिती कंबोज यांनी दिली आहे. तसेच, “कोणीही खोट्या अफवांवर किंवा बातम्यांवर विश्वास ठेवू नये” असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. याप्रकरणी कोर्टात तारखा सुरू आहेत. मानहानीच्या सर्व केस मी काढून घेतलेल्या नाहीत. असे ही कंबोज यांच्याकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता ज्या काही अफवा पसरवल्या जात होत्या त्यांना पूर्णविराम मिळाला आहे.