सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा शहरातील मंगळवार पेठेत गोळीबार केल्याप्रकरणी पाेलीसांनी आमिर इम्तीयाज मुजावर (एएम कंपनी) व त्याच्या सात साथीदारांविरुद्ध माेक्का कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे. पाेलिस अधीक्षक समीर शेख यांनी सातारा जिल्ह्याचा कार्यभार स्विकारल्यानंतर माेक्का अंतर्गत झालेली ही पहिलीच कारवाई आहे. त्यामुळे सातारा जिल्हातील गुन्हेगारी टाेळ्यांवर कठाेर कारवाई हाेणार असल्याचे संकेतच पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी दिले आहेत.
यश संजय बीडकर हा युवक त्याच्या मित्रांबराेबर दांडिया पाहून घरी जात हाेता. त्याचवेळीस एका ठिकाणी अभिजित भिसे या युवकाने यशचा मित्र सर्वेश महाडिक याच्या पायावर टू व्हिलर घातली. त्यातून वाद झाला हाेता. त्यानंतर यश हा मित्रासमवेत त्या ठिकाणाहून निघून गेला. काही वेळाने अमीर शेख, अभिजित भिसे हे त्याच्या मित्रांसह मनामती चौकात आले. तेथे यश बीडकरला पाहून अमीर शेखने पिस्तूल काढत. तुला जिवंत ठेवत नाही असे म्हणत शेखने यशच्या दिशेने गोळी झाडली. विजयादशमीच्या आदल्या रात्री दांडिया नंतर मनामती चौकात हा गोळीबार झाला हाेता.
या गुन्ह्याचा तपासात आमिर मुजावर याने कट रचून गुन्हा करण्यासाठी एएम कंपनी नावाची टाेळी सदस्यांचा वापर केला असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पाेलिसांनी संशयितांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये कारवाई करीता पाेलीस अधीक्षक यांच्या माध्यमातून विशेष पाेलीस महानिरिक्षक (काेल्हापूर) यांच्याकडे माेक्का अंतर्गत प्रस्ताव दिला हाेता. त्यास मंजूरी मिळाली. त्यानूसार आमिर इम्तियाज मुजावर, आमिर सलीम शेख, अबु उर्फ अभिषेक राजू भिसे, साहील विजय सावंत, आहद आयुब आत्तार, आेमकार राजू भिसे, संग्राम विजय जाधव तसेच एक अल्पवयीन मुलगा यांच्यावर माेक्का कायदा अंतर्गत कारवाई झाल्याची माहिती पाेलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली.