नवी दिल्ली । आपल्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात जेव्हा अचानक पैशाची गरज भासते. अशा परिस्थितीत आता भविष्य निर्वाह निधी अर्थात PF च्या नवीन नियमांमुळे तुम्हाला कोणाच्याही समोर हात पसरावे लागणार नाहीत. या नव्या नियमानंतर PF खातेधारकांना पैसे काढण्यासाठी 3 दिवस वाट पाहावी लागणार नाही तर PF चे पैसे तासाभरात तुमच्या खात्यात येतील.
वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत 1 तासात पैसे काढता येतात
आता तुम्ही तुमच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून (EPF) एक लाख रुपये एडवांस मध्ये काढू शकता. कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत तुम्ही हे पैसे काढू शकता. या सेवेचा लाभ घेण्यासाठी, तुम्ही फक्त इमर्जन्सी मुळे पैसे काढत असल्याचे दाखवावे लागेल.
PF पैसे कसे काढायचे ?
यासाठी तुम्हाला सर्वप्रथम http://epfindia.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
वेबसाइटच्या मेनपेजवर, वरच्या उजव्या कोपर्यात ऑनलाइन एडव्हान्स क्लेम वर क्लिक करा.
यानंतर http://unifiedportalmem.epfindia.gov.in/memberinterface वर जा.
ऑनलाइन सर्विसेसवर जा. यानंतर क्लेम फॉर्म-31,19,10C आणि 10D भरा.
तुमच्या बँक खात्याचे शेवटचे 4 अंक एंटर करा आणि व्हेरिफाय करा.
Proceed for Online claim वर क्लिक करा.
ड्रॉप डाउनमधून PF एडव्हान्स निवडा.
पैसे काढण्याचे कारण निवडा. रक्कम एंटर करा आणि चेकची स्कॅन केलेली कॉपी अपलोड करा. मग तुमचा पत्ता टाका.
Get Aadhaar OTP वर क्लिक करा आणि आधार लिंक केलेल्या मोबाईलवर मिळालेला OTP टाका.
यासह तुमचा क्लेम दाखल केला जाईल. एका तासात तुमच्या खात्यात PF क्लेमचे पैसे येतील