हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. कारण त्याच्यानंतर आता त्यांच्या दोन्ही मुलांना ईडीने नोटीस पाठवली असून त्यांनाही समन्स बजावलेला आहे.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सध्या नवाब मलिक हे अटकेत आहेत. त्यांनी आपल्या इतके विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. त्यावर उद्या ( 22 एप्रिल) रोजी सुनावणीची शक्यता व्यक्त केली जात आहे. तत्पूर्वी ईडीच्या वतीने मलिक यांच्या दोन्ही मुलांना ईडीकडून नोटीस पाठविण्यात आली असून हजर राहण्याचा समन्सहि बजावण्यात आला आहे. तसेच ईडीकडून लवकरच मुलांविरोधात चार्जशिटही दाखल करण्याची शक्यता वर्तवली आहे.
या दरम्यान मलिक याचे अमीर मलिक व फराज मलिक यांना ईडीकडून समन्स देऊनही दोघांकडून ईडीच्या चौकशीसाठी गैरहजेरी लावण्यात आली आहे. तत्पूर्वी मलिक यांचा मुलगा फराज मलिक याला ईडीकडून तब्बल ३ वेळा तर अमीर मलिक याला 2 वेळा ईडीकडून नोटीस पाठवून समन्स बजावण्यात आलेला आहे. मात्र, तरीही ते ईडीच्या चौकशीसाठी हजर झाले नाहीत. त्यामुळे आता त्यांच्या विरोधात ईडीकडून चार्जशीट दाखल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.