Twitter वरील ब्लू टिकसाठी मोजावे लागणार पैसे, अन्यथा..; Elon Musk यांचा पहिला दणका

twitter blue tik
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ट्विटरचे मालक झाल्यानंतर एलोन मस्क यांनी यूजर्सना पहिला झटका दिला आहे. ट्विटर ब्लु टिक असलेल्या वापरकर्त्यांना आता दरमहा सुमारे 1,600 रुपये द्यावे लागतील. यापूर्वी ही सेवा फ्री होती. मात्र इथून पुढे ब्लू टिक व्हेरिफिकेशन साठी पैसे मोजावे लागणार आहेत.

रिपोर्टनुसार, एलोन मस्क ब्लू व्हेरिफिकेशन प्रक्रिया बदलण्याचा विचार करत आहे. ट्विटर ब्लूचे सब्सक्रिप्शन घेतल्यानंतर, वापरकर्त्यांना ट्विट एडिट करण्यासोबत अनेक विशेष वैशिष्ट्ये मिळतात. Twitter Blue टिकचे मासिक सबस्क्रिप्शन 19.99 डॉलर म्हणजेच सुमारे 1,600 रुपये आहे. ज्यांचे अकाउंट आधीच व्हेरिफाय आहे त्यांना 90 दिवसांच्या आत ट्विटर ब्लूचे सब्सक्रिप्शन घ्यावे लागेल, अन्यथा प्रोफाइलमधून ब्लू टिक काढून टाकली जाईल.

खार तर ट्विटर ब्लू सब्सक्रिप्शन सुमारे एक वर्षापूर्वी लॉन्च करण्यात आले होते. ब्लू टिक सब्सक्रिप्शन, ट्विटर यूजर्सना काही अतिरिक्त वैशिष्ट्ये ऑफर करण्यात आली आहेत, जी सामान्य ट्विटर वापरकर्त्यांसाठी लॉक केलेली आहेत. यामध्ये विविध होम कलर स्क्रीन आयकॉन्सचाही समावेश आहे. खरं तर, ट्विटरला ट्विटर ब्लू सब्सक्रिप्शन आणि पेड व्हेरिफिकेशनद्वारे आपला महसूल वाढवायचा आहे.