मी माझे शब्द मागे घेतो, आम्ही दोघेही सरकारसोबत; राणांकडून वादावर पडदा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यातील सुरु असलेला शाब्दिक वाद आणि आरोप प्रत्यारोप संपुष्टात आला आहे. काल रात्री उशिरा जवळपास ४ तास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत रवी राणा आणि बच्चू कडू यांची बैठक पार पडली त्यानंतर आज सकाळी रवी राणा यांनी फडणवीसांची स्वतंत्र भेट घेतली आणि या वादावर पडदा टाकल्याचे जाहीर केलं.

प्रसारमाध्यमांशी बोलताना रवी राणा म्हणाले, बच्चू कडू यांच्याबाबत गुवाहाटी संदर्भात हे काही विधान केलं ते शब्द मी मागे घेतो. मात्र ज्यापद्धतीने बच्चू कडू यांच्या तोंडातून काही अपशब्द गेले होते. तेही शब्द त्यांनी मागे घ्यावे. आम्ही दोघेही सरकारचे घटक असून सरकारसोबत आहे. आम्ही दोघेही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासोबाबत असून आमच्यातील वादापेक्षा महाराष्ट्राचा विकास आणि उन्नती महत्त्वाची आहे असं रवी राणा म्हणाले.

जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि विकास करण्यासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने महाराष्ट्राला एक मजबूत सरकार मिळाला आहे. महाराष्ट्रात अडीच वर्षात ठाकरे सरकारच्या काळात जे प्रश्न निर्माण झाले ते मार्गी लावायचं काम सरकार करत आहेत. त्यामुळे आमच्या वादामुळे कोणाचं मन दुखलं असेल , आणि कोणाचा गैरसमज झाला असेल तर मी माझे शब्द मागे घेतो आणि हा वाद संपवतो असं रवी राणा यांनी स्पष्ट केलं.

राणा -कडू यांच्यातील वाद नेमका-

रवी राणा यांची बच्चू कडू यांच्या वर गुवाहाटीला जाण्यासाठी खोके घेतल्याचा आरोप केला होता. थेट बच्चू कडू यांच्या मतदारसंघात जाऊन ना बाप बडा ना भैया … सबसे बडा रुपय्या अशी इथल्या आमदाराची स्लोगन आहे अशी घणाघाती टीका रवि राणा यांनी केली होती. त्यानंतर आक्रमक झालेल्या बच्चू कडू यांनी रवी राणा याना आरोपांबाबत पुरावे देण्यास सांगितलं . तसेच मी जर पैसे घेतले असेल तर मला कोणी दिले पैसे? शिंदेनी दिले कि फडणवीसांनी दिले हे सुद्धा स्पष्ट झालं पाहिजे अस बच्चू कडू यांनी म्हंटल. रवी राणा यांनी १ नोव्हेंबर पर्यंत आपल्यावरील आरोपाचे पुरावे दिले नाही तर मी वेगळा निर्णय घेईन असा इशाराच त्यांनी सरकारला दिला. त्यानंतर काल रात्री उशिरा दोन्ही नेत्यांची मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक पार पडली आणि यामध्येच या वादावर पडदा पडला.