हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मान्सून पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. रत्नागिरी, सिंदुधुर्ग, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला जोरदार झोडपले आहे. पुढील तीन दिवस मान्सून पावसाचा जोर वाढणार आहे.
निवळी घाटात दरड कोसळल्याने मुंबई- गोवा महामार्गावर वाहतूक थांबली होती. दरड हटविण्याचे काम हाती घेतले असून वाहतूक एकेरी सुरू करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्याला रात्रभर पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी 20 फुटापर्यंत वाढलेली आहे. तर त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक नद्यांची पाणीपातळी वाढलेली आहेत.
सातारा जिल्ह्यातही पाऊस चांगलाच झाला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचून राहिलेले आहे. जिल्ह्यातील कोयना, धोम, कण्हेर धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण जादा प्रमाणात होते. रत्नागिरी- राजापूर मार्गावरही पाणी वाढू लागलेले आहे. जवाहर चाैकात पाणी आले असून बाजारपेठेत पाण्याची शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चिपळूण- गुहागर तालुक्यात पावसाचा जोर वाढला. चिपळूण बाजारपेठेत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.