धक्कादायक! सावकाराने ‘या’ कारणामुळे महिलेसह तिच्या मुलाला जिवंतपणी जाळले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चंद्रपूर प्रतिनिधी | एका सावकाराने व्याजाने दिलेल्या रकमेसाठी महिलेसह तिच्या मुलावर पेट्रोल टाकून आग लावल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात घडलाय. यामध्ये आई आणि मुलगा दोघेही भाजले असून त्यांना कोलसिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.

सदर घटना सरकारनगर येथील असून मंगळवारी दुपारी 1:00 च्या सुमारास घडली. सरकारनगर येथील रघुनाथ हरणखेडे यांच्यावर असलेल्या कर्जाची रक्कम मागण्यासाठी सावकार आला होता. दरम्यान, हरणखेडे यांनी आज सकाळी पैसे देण्याचे कबूल केले. यानुसार आज दुपारी तो सावकार पैसे मागण्याकरिता आला, परंतु हरणखेडे घरी नसतानाही त्याने हरणखेडे यांच्या पत्नीशी भांडण सुरु झाले.

यावेळी सावकार ‘तू माझे पैसे दे, नाहीतर मी तूला जाळून टाकणार’, अशी धमकी देऊ लागला आणि त्याने लगेच पेट्रोल आणून त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये हरणखेडे यांची पत्नी व मुलगा भाजला आहे.

Leave a Comment